Skip to content Skip to footer

हाऊसफुल्लचा बोर्ड असला तरी १० तिकीटं असतातच – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या जोरदार रस्सीखेच चालू झालेली आहे. कधी कोणता नेता कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे आज तागायत सांगता येणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशहचं राजकारण सुरु झाले आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सुरुंग लावला होता. त्यामुळे आता भाजपला हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागला आहे.

तसेच मेगा भरतीचा बुधवारचा महाइवेंट प्रचंड यशस्वी झाला. त्यामुळे आता भाजपमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नाही. त्यामुळे जसा सिनेमा हिट ठरल्यावर हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागतो, तसा बोर्ड भाजपच्या कार्यालयाबाहेर लावण्याची वेळ आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, जे योग्य आहेत त्यांना प्रवेश दिला आहे. जे योग्य नाहीत त्यांना जागा नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर चंद्रकांत पाटलांनी सिक्सर मारला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, हाऊसफुल्लचा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्याकडे स्वतःची 10 तिकिटं असतातच असं सांगत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा भरती चालूच आहे असे संकेत दिले. त्यामुळे पाटील यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना धडकीच भरलेली दिसू येत आहे.

Leave a comment

0.0/5