Skip to content Skip to footer

गृह मंत्री अमित शहा यांनी छत्रपती उदयनराजेंना दिले दिल्लीत भेटीचे आमंत्रण

साध्य भाजपात इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांची जोरदार इनकमिंग चालू झालेली आहे. मुंबई येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला कोळंबकर, छत्रपती शिवेंद्र राजे, चित्रा वाघ, मधुकर पिचड, वैभव पिचड आणि संदीप नाईक यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला होता.

आता अजून एक महाराष्ट्रातील वजनदार व्यक्ती म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणारा असल्याचे वृत्त समोर येत आहे. या साठी खुद्द गृह मंत्री अमित शहा यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत भेटायचे आमंत्रण दिलेले आहे. त्यामुळे आता अमित शहा हे उदयनराजेंना भाजपवासी करतात की काय अशा चर्चा रंगली आहेत.

याबाबतचे वृत्त या एका खाजगी वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केले आहे. यामध्ये पुण्याचे खा. गिरीश बापट यांच्यामार्फत खा. उदयनराजे भोसले यांना फोन करण्यात आला. बापट यांनी अमित शहांना बोलयाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित शहा यांनी महाराजांची विचारपूस केली व दिल्ली येथे भेटीचे आमंत्रण दिले.

अमित शहा आणि उदयनराजे यांच्यातल्या झालेल्या या संभाषणामुळे राजकीय चर्चना उधान आले आहे. मात्र आता थेट अमित शहा यांनी उदयनराजेंना फोन केल्याने आता उदयनराजे देखील भाजपात जाणार की काय ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Leave a comment

0.0/5