Skip to content Skip to footer

राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार वैभव नाईक यांनी मतदार संघात केलेली कामे लोकांपर्यत पोहचत असल्याने शिवसेनेकडे लोकांचा ओघ वाढत आहे. शुक्रवारी हे अभियान आंब्रड विभागात पोहोचले. या विभागामधील भरणी गावातील अनंत परब, वसंत परब, अरुण परब यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानचे सुमारे ५० ते ६० कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी भरणी गावातील अनंत परब, वसंत कदम, अरुण परब, अशोक परब, भास्कर परब, महादेव परब, संदेश परब, प्रकाश सरंगले, मंगेश सरंगले, प्रनेश सावंत, भालचंद्र परब, विठ्ठल पालव, दत्तराज परब, विश्राम परब, ज्ञानदेव परब, सोयम परब, राहुल सरंगले,समीक्षा पालव, संदेश परब, समृद्धि परब आदींसह ५० ते ६० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून व पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

Leave a comment

0.0/5