Skip to content Skip to footer

जिंकलेल्या जागा सोडून ठरणार युतीचा फॉर्मुला……

लोकसभा निवडणुकीत झालेली शिवसेना – भाजपा युती ही विधानसभा निवडणुकीला देखील तशीच राहणार आहे. त्यामुळे भाजपा – शिवसेनेचा विधानसभेच्या जागा वाटपासाठी ५० – ५० हा फॉर्म्युला असणार आहे. २०१४ मध्ये निवडून आलेल्या जागा त्या त्या पक्षांकडे राहतील मात्र उरलेल्या जागांवर ५०-५० फॉर्म्युला वापरला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपाने गेल्यावेळी १२२, तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. या जागा तशाच कायम ठेवत उर्वरित १०३ जागांपैकी निम्मे-निम्मे जागांचे वाटप होऊ शकते. तसेच युतीतील लहान मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातूनच जागा द्याव्या लागणार असल्याने आमदारांव्यतिरिक्तच्या जागांमध्ये भाजपच्या वाट्याला तुलनेने कमीच जागा येतील अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली.

Leave a comment

0.0/5