Skip to content Skip to footer

राष्ट्र्वादीत दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात – गिरीश महाजन

सध्या राष्ट्र्वादीतील अनके नेते पवारांची साथ सोडून शिवसेना-भाजपा पक्षात प्रवेश करत आहे. त्यामुळे शरद पवारांपुढे आता पक्ष वाचवण्याचे संकटच पुढे उभे राहिलेले आहे. यासाठी आता राष्ट्रवादी आपल्या नेत्यांना “आम्ही पक्ष सोडून जाणार नाही” अशी शपथ देत आहे. या कार्यक्रमावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. राष्ट्रवादीचे अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात असा दावा महाजन यांनी केलेला आहे. सध्या माझा अर्धा दिवस भाजपा प्रवेशाची यादी पाहण्यातच जात आहे असे सुद्धा बोलून दाखविले.

 

नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, सध्या माझाकडे ५० च्या वर लोकांची यादी आहे. जे भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. माझा निम्मा दिवस ही लिस्ट बघण्यातच जात आहे.

माजी आमदार यांच्या बरोबर आजी आमदार सुद्धा भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. सोबत मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही आणि मी मुख्यमंत्रीच्या रेस मध्ये सुद्धा नाही असे सुद्धा महाजन यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5