Skip to content Skip to footer

देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस – आदित्य ठाकरे

केंद्र सरकारकडून कलम ३७० हटविल्यानंतर सर्व स्तरातून मोदी सरकारचं कौतुक केलं जात आहे. देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ३७० कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेल असा विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

आदित्य ठाकरे| Historical day in the history of the country

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एनडीएसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठीच आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात भाजपाला पाठिंबा दिला होता.

Leave a comment

0.0/5