Skip to content Skip to footer

पराभवाच्या खात्रीनेच विरोधकांचे ईव्हीएम विरोधात बंड – मुख्यमंत्री

`विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खात्री असल्याने विरोधक ईव्हीएमवर खापर फोडत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. तीन दिवसांत आपण केलेल्या ४९१ किलोमीटरच्या प्रवासात लोकसभेप्रमाणे युती सरकारला जनतेमध्ये अनुकूल वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाजनादेश यात्रेनिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार सुजीतसिंह ठाकूर, खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित होते.

युती सरकारला साथ देण्याची जनतेची मानसिकता असल्याने विरोधक भांबावलेले असून सर्व प्रश्नांना आम्ही संवेदनशीलतेने प्रतिसाद देत असल्याचे जनतेने जाणले आहे. संभाव्य पराभवाचे खापर पोडण्यासाठी विरोधक ईव्हीएमचा मुद्दा उकरून काढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षांना उमेदवार मिळणे अवघड झाले आहे.

अशा केविलवाण्या स्थितीत कार्यकर्त्यांकडून निष्ठेची शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आघाडी सरकारच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट प्रमाणात कामे केल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Leave a comment

0.0/5