Skip to content Skip to footer

जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम हटवण्याची शिफारस – अमित शहा

देशातील सगळ्यात मोठा प्रश्न बनलेल्या जम्मू-कश्मीरसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवदेन दिले आहे. जम्मू-कश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्यासाठीची शिफारस करत ऐतिहासिक घोषणा केली. यावर राष्ट्रपती कोविंद यांनी मंजुरी देखील दिली आहे. तसेच जम्मू-कश्मीरच्या पुनर्रचने संदर्भातील शिफारस देखील करण्यात आली. त्यानंतर राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.

दोन दिवसांत कश्मीर खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. राजकीय वातावरणही तापले आहे. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यात रविवारी कश्मीरातील सुरक्षेविषयी चर्चा झाली आणि पाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन केले आहे. तसेच काँग्रेस आणि विरोधकांनी सुद्धा यावर चर्चा करावी अशी मागणी शहा यांनी केली.

कलम ३७० हे कश्मीरला हिंदुस्थानसोबत जोडण्यासाठी होते हे गुलाम नबी आझाद खोटं बोलत आहेत अश्या शब्दात शहा यांनी आझाद यांच्यावर जोरदार टीका केली. यावर मी विरोधकांची सर्व उत्तरे देईल फक्त विरोधकांनी ऐकून घयावे. असे सुद्धा शहा यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5