Skip to content Skip to footer

शिवसेना पक्षात मेगा भरती नाही तर स्किल भरती – आदित्य ठाकरे

सध्या भाजपा पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांचे जोरदार इनकमिंग चालू झालेले आहे. शिवेंद्रराजे भोसले, कोळंबकर, वाघ, पिचड आणि नाईक यासारख्या बड्या राजकीय घराण्यांनी आपल्या पक्षाला राम-राम करत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षात सुद्धा जोरदार इनकमिंग चालू होणार अशीच शक्यता वर्तवली जात होती यावर शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे.

शिवसेनेत मेगा भरती नव्हे तर ‘स्कील’ भरती सुरू आहे, अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेमध्ये काम पाहून प्रवेश दिला जातो, असे प्रतिपादनही आदित्य ठाकरे यांनी केले. बीड शहरातील अद्ययावत नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

बीड येथे जनआशीर्वाद यात्रेत बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, परवा मुंबईत मला प्रश्न विचारला गेला, भाजप-शिवसेनेत सध्या मेगा भरती सुरू आहे. तेव्हा मी म्हणालो, शिवसेनेत मेगा भरती नव्हे तर स्कील भरती सुरू आहे. काम करणाऱयांना त्याचे काम बघूनच शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातो, असे ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5