Skip to content Skip to footer

काँग्रेस अध्यक्ष येत्या १० ऑगस्टला ठरवला जाणार..?

अखेर शेवटी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर येत्या १० ऑगस्टला काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष ठरवला जाणार आहे. त्यामुळे खच्चीकरण होत असलेल्या पक्षाला काही प्रमाणात उभारी मिळणार आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत चर्चा केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसला अध्यक्ष नसल्यामुळे काँग्रेसवर सर्व थरांतून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर गांधी घराण्याकडेच अध्यक्ष पद ठेवले तर त्याचा पक्षासाठी चांगला परिणाम होऊ शकतो, असा काँग्रेसमधील जुन्याजाणत्या नेत्यांचा सल्ला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ प्रियंका गांधी यांच्या गळय़ात पडण्याची शक्यता आहे.

कार्यकारिणीच्या बैठकीत किंवा त्या बैठकीनंतर प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडल्यानंतर या पदासाठी कोणीही पुढे आलेले नाही. पक्षाच्या अध्यक्षाला राजकीय वलय आणि ओळख असणे, आक्रमक चेहरा असणे आवश्यक आहे.

हे सगळे गुण प्रियंका यांच्याकडे असल्यामुळे गेले काही दिवस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावालाच पसंती दिली आहे. शशी थरूर, पी. चिदंबरम, करण सिंह यांनीही प्रियंका यांच्या नावाला पसंती दिली आहे.

Leave a comment

0.0/5