Skip to content Skip to footer

यात्रा सुरु होण्याआधीच शिवस्वराज्य यात्रेत पडली फूट

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा “शिवस्वराज्य यात्रे”चे आयोजन केले आहे. या शिवस्वराज्य यात्रेची संपूर्ण जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर स्टारप्रचारक म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सध्या पक्षात होत असलेली आउटगोइंग आणि त्यामुळे कार्यकर्त्याचे होणारे खच्चीकरण रोखण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला खटाटोप आहे.

परंतु या यात्रेपासून राष्ट्रवादीचे आमदार तथा पवारांचे मानस पुत्र मानले जाणारे आ. जितेंद्र आव्हाड यांना लांब ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे उभ्या राष्ट्रवादी पक्षात सुद्धा दोन गट निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. खरं पहिले तर कोल्हे यांना पक्षात येऊन फक्त चार महिने झालेले आहे आणि तेच आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्ष सोडून न जाण्याची शपथ देत आहे. हे कुठेतरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खटकत आहे. ज्याने आपल्या फायद्यांसाठी पक्ष बदलला तो काय आम्हाला निष्ठेचे धडे देणार अशीच ओरड सध्या राष्ट्रवादीचा जुन्या कार्यकर्त्याची आहे.

Leave a comment

0.0/5