Skip to content Skip to footer

काँग्रेस आमदार कुणाल पाटील भाजपात येण्यास आग्रही – गिरीश महाजन

गुलाबराव देवकर मला दोन वेळा भेटले. मनिष जैन तर कामानिमित्त नेहमीच भेटतात. देवकरांशी चांगली सकारात्मक चर्चा झाली. मात्र हवापाण्याबद्दल. काँग्रेसचे कुणाल पाटील हे आपणास भाजपात घ्या म्हणून आग्रही आहेत. उत्तर महाराष्ट्रातुन अपवाद वगळता सर्वच जण भाजपात येण्यास उत्सुक असल्याचा दावा जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सायंकाळी अजिंठा विश्राम गृहावर आयोजित पत्रपरिषदेत केला. तसेच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ७ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5