Skip to content Skip to footer

काश्मीर प्रश्न कोल्हापूरच्या जावयाने सोडविला : सोशल मीडियावर मॅसेज वायरल

‘शेवटी काश्मीर प्रश्न कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला, दाजी विषय हार्ड’, ‘जे मोदींना ६० महिन्यांत जमले नाही, ते शहांनी ६० दिवसांत करून दाखवले’, इथपासून ‘काश्मिरात दल लेकसमोर टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅटचे बुकिंग सुरू’, ‘रणजी सामन्यांसाठी आणखी एक संघ मिळाला…’ असे एकाहून एक भन्नाट मेसेज, फोटो मेसेजनी सोमवारी धमाल उडवून दिली. फेसबुक,ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सकाळी ११ वाजल्यापासून काश्मीरशी संबंधित मेसेजचा पूरच आला.
अमरनाथ यात्रा थांबवून सर्व भाविकांना कशिमर मधून सुखरूप बाहेर काढण्याच्या हालचाली सुरूर झाल्या होत्या.

त्यामुळे काश्मीर मध्ये काही तरी घडणार आहे अशी कल्पना आधीच आली होती. . रविवारी सायंकाळपर्यंत टिष्ट्वटरवर काश्मीरचा मुद्दा ट्रेंडिंगवर आला. सोमवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी विभाजनासह कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताच सर्वच माध्यमांत चर्चेला ऊत आले. ‘काश्मीर पर फायनल फाइट’, ‘जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर, वन कंट्री वन सिस्टीम’, ‘ऑपरेशन काश्मीर’, ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अशा हॅशटॅगने टिष्ट्वटरवर लक्ष वेधण्यात येत होते

Leave a comment

0.0/5