Skip to content Skip to footer

कलम ३७० च्या निर्णयावरून मेघा पाटकर यांचा सरकारवर हास्यास्पद आरोप

जम्मू काश्मीर मधील कमल ३७० हटवण्याचा निर्णय भाजपा सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम काढून टाकण्याची शिफारस राज्यसभेत केली. गृहमंत्री शहा यांनी सभागृहात विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला. तर दुसरीकडे सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. सर्वत्र फटाके आणि पेढे वाटून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे.

परंतु सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात काही सामाजिक कार्यकर्ते भलतेच आरोप लावत असलेले पाहायला मिळत आहे. त्यात अजून एक नाव समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका करत सरकारच्या निर्णयावर संशय व्यक्त केलेला आहे.

हा निर्णय सरकारने त्या ठिकाणची नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा ठेऊन घेतला असल्याचं म्हटले आहे. भाजपला 370 कलमाविषयीचे मत वेगळेच होते. काश्मीरी जनतेचे मत विचारात घेतले गेले नाही असेही मेधा पाटकर म्हणाल्या आहेत.

Leave a comment

0.0/5