Skip to content Skip to footer

कलम ३७० च्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

गृह मंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम काढून टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय मांडलेला आहे. या निर्णयाचे संपूर्ण देशभरातुन मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. जे इतके वर्ष काँग्रेस सरकारला जमले नाही ते फक्त आणि फक्त भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला जमलेले आहे. यावर काही विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले तर काही विरोधकांनी सरकारवर टीका सुद्धा केली आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सरकारच्या या पोलादी निर्णयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याच उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारच्या या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !’ अशा शब्दात सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत अनेक विरोधी पक्षांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यात एआयएडीएमके, लोजपा, आरपीआय, अकाली दल, शिवसेना, वायएसआरसीपी, टीआरएस, बीजेडी, टीडीपी, आम आदमी पार्टी आणि भाजपा यांचा समावेश आहे.

Leave a comment

0.0/5