Skip to content Skip to footer

काश्मिरात पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील – आढळराव पाटील

गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त करून देणारे कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशात उस्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सर्वत्र फटाके आणि पेढे वाटून या निर्णयाचे स्वगहत करण्यात आलेले आहे. शहा यांनी सभागृहात संसोधन विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला. तर दुसरीकडे सर्व भारतीयांनी आनंद व्यक्त केला होता.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे. भारतीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जाईल. कलम ३७० रद्द करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. या निर्णयाचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर सकारात्मक दूरगामी परिणाम तर होतीलच शिवाय जम्मू आणि काश्मिर मधील सामाजिक शांतता निर्माण करण्यात हा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल असं पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5