Skip to content Skip to footer

कलम ३७० बद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींचे विडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल…..

गृह मंत्री अमीत शहा यांनी काल काश्मीरला विशेष अधिकार प्राप्त करून देणारे कलम ३७० हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण देश भरात स्वागत करण्यात आलेले आहे. तर केंद्रात मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा “मातोश्री” या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले.

सध्या सोशल मिडीयावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काश्मीर मुद्यावरील जुने विडिओ सध्या दाखविले जात आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे आपण पंतप्रधान झाल्यास पहिलं काम कोणतं करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देतांना बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, “सर्वात आधी काश्मीरचा कचरा साफ करणार. काश्मीरमध्ये एकही पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक राहता कामा नये. एकाही दहशतवाद्यावर खटला चालवणार नाही, थेट त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश देईन”. असे परखड मत त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

Leave a comment

0.0/5