Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेण्यात आला….

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी जवळपास 53 फुटांनी वाढलेल्या अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील पुराची गंभीर स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सातारा, सांगली, कोल्हापुरातील पुराचा आढावा घेतला. बैठकीअगोदर पुरग्रस्तांना स्वच्छ पाणी, जेवण देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिला.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याने अनेक नद्यांना पूर आला. या भागात एनडीआरएफच्या २२ टीम दाखल झाल्या आहेत. तसेच ८० भारतीय जवानदेखील दाखल झालेत. करवीर, शिरोळमधील ८ गावं पुरात बुडाली आहेत.

सांगलीतील राजाराम बंधाऱ्यातून पाणी वाहू लागल्या लागल्याने २०४ गावातून ११ हजार ४३२ कुटुंबांतील ५१ हजार ७८५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. सांगली ३०७ टक्के पाऊस झाला आहे. महिला, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देत आहे.

Leave a comment

0.0/5