Skip to content Skip to footer

कलम ३७० या ऐतिहासिक निर्णयाला खा. कोल्हे यांची दांडी……

गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम काढून टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय मांडलेला आहे. या निर्णयाचे संपूर्ण देशभरातुन मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. जे इतके वर्ष काँग्रेस सरकारला जमले नाही ते फक्त आणि फक्त भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला जमलेले आहे. यावर काही विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले तर काही विरोधकांनी सरकारवर टीका सुद्धा केली आहे.

कलम ३७० या ऐतिहासिक निर्णयावर चर्चा होता असताना या चर्चेला शिऊर मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार कोल्हे हे अनुपस्थित दिसले होते. आज देशातील संसदेत अत्यंत महत्वाच्या विषयवार चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे खासदार पक्षातर्फे काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेत व्यस्त असताना दिसून आले होते.

त्यामुळे सर्वत्र कोल्हे यांच्या अनुपस्थितीमुळे उलट-सुलट चर्चा होत होती. अमोल कोल्हे हे उपस्थित नसणे हे त्यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही लज्जास्पद बाब आहे. अशी चर्चा राज्यात होताना दिसून येत होती.

Leave a comment

0.0/5