Skip to content Skip to footer

अखेर जम्मू-काश्मीर मध्ये डौलाने तिरंगा फडकला

कमल ३७० जम्मू काश्मीर मधून हटवण्याचा निर्णय भाजपा सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी कश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम काढून टाकण्याची शिफारस राज्यसभेत केली. गृहमंत्री शहा यांनी सभागृहात विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला. तर दुसरीकडे सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. सर्वत्र फटाके आणि पेढे वाटून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे.

जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम हटवण्या संदर्भात विधेयक दोन्ही संसदेत मंजूर झालेले आहे. त्यानंतर भारतीय तिरंगा आज डौलाने जम्मू काश्मीर मध्ये फडकवला जात आहे. श्रीनगर मधील नागरी सचिव कार्यलयावर तिरंगा फडकवण्यात आलेला आहे. कलम ३७० अंतर्गत जम्मू काश्मीर मध्ये स्वतन्त्र झेंडा फडकवण्यात येत होता. त्यामुळे कोणत्याही सरकारी कार्यालयात, स्वतन्त्र दिनी, प्रजासत्ताक दिनीं भारतीय तिरंगा फडकावला जात नसे. मात्र तेथेही आता तिरंगा फडकविला जाणार आहे.

Leave a comment

0.0/5