Skip to content Skip to footer

पंतप्रधान पदासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुषमा स्वराज यांच्या नावाला होती पसंती

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २०१४ च्या पंतप्रधान निवडणुकीच्या पदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांचे कौतुक करत सध्या भाजपात पंतप्रधान पदासाठी फक्त सुषमा स्वराज लायक आहे असे बोलून सुद्धा दाखविले होते. तसेच वरिष्ठ नेत्यांकडे पंतप्रधान पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस सुद्धा केली होती. २०१४ मध्ये सामना मध्ये दिलेल्या आपल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांचे तोंडभरून कौतुक सुद्द्धा केले होते.

आज तरी हुशार, ब्रिलियंट अशी एकच व्यक्ती सध्या भाजपाकडे आहे. ती म्हणजे सुषमा स्वराज, पंतप्रधान पदासाठी त्या अप्रतिम पसंती होईल. लायक आहे, हुशार बाई आहे. ती अप्रतिम रित्या दणदणीत काम करतील असे माझे स्पष्ट मत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातर्फे एनडीएच्या उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांच्या नावाची घोषणा सुद्धा केली होती. तसेच त्यांच्या नावाला पाठिबा सुद्धा जाहीर केला होता.

एनडीएच्या पंतप्रधान म्हणून जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्या नावाची शिफारस केली तेव्हा भाजपात सर्वांच्या भुवळ्या उंचावल्या होत्या. कारण तेव्हा पंतप्रधान पदी भाजपातून नरेंद्र मोदी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्या नावाला आपली पहिली पसंती दर्शवली होती.

Leave a comment

0.0/5