Skip to content Skip to footer

कोल्हे आदित्य ठाकरे यांच्याकडून काहीतरी शिका….

राष्ट्र्वादीत होत असलेली आउटगोइंग रोखण्यासाठी आणि पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने संपूर्ण राज्यभर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात येणार आहे. या संपूर्ण यात्रेची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

परंतु ही यात्रा सध्या भलत्याच कारणासाठी चर्चेत येत आहे. या यात्रेदरम्यान अमोल कोल्हे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शेतात शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद हा दिखाऊपणा आहे अशी टीका कोल्हे यांनी केली होती. आज आदित्य ठाकरे सुद्धा “जन आशीर्वाद यात्रे”च्या माध्यमातून राज्यभर दौरा करत आहे. या यात्रेदरम्यात आदित्य ठाकरे यांनी जनतेची अनेक कामे सुद्धा मार्गी लावलेली आहे. आणि याची पोच पावती सुद्धा जनतेने दिलेली आहे.

 

या काँग्रेस नेत्याचे कलम ३७० विरोधात दिला मोदी सरकारला पाठिंबा

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या महाराजांच्या नावाचा वापर करून फक्त आणि फक्त सुडाचे राजकारण करायचे हे एका खासदाराला न पटणारे वागणे आहे. फक्त कोणीतरी सांगत म्हणून टीका करायची अशीच अवस्था सध्या अमोल कोल्हे याची झालेली आहे. म्हणुनच आज यात्रा काढल्या तरी आपले काहीही भले होणार नाही याची कल्पना खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांना आलेली आहे.

आज शिवसेनेत असताना "घडाळ्यात वाजले बारा तसे राष्ट्रवादीचे वाजले बारा" अशी टीका राष्ट्रवादीवर करणारे कोल्हे आज त्याच पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून मिरवत आहे. म्हणूनच ज्यांनी फक्त राजकारणासाठी पक्षाशी निष्ठा न ठेवता इतर पक्षात प्रवेश केला आणि तेथील कट्टर कार्यकर्त्यावर अन्याय केला त्यांनी इतरांवर टीका करताना शंभरवेळा नाहीतर हजारवेळा विचार करावा.

Leave a comment

0.0/5