Skip to content Skip to footer

लेटर बॉम्बमुळे राष्ट्र्वादीत मोठा भूकंप

सध्या राष्ट्र्वादीत निनावी पत्रामुळे मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीमध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पद ही फक्त मराठा समाजाला दिली जात आहेत, असा आरोप करत एक निनावी पत्र व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात आहे, असा दावा पत्र लिहिणाऱ्याने केला आहे.

 

‘एकीकडे पुरोगामी भूमिका मांडत शरद पवार नेहमी पक्षात सर्व जातीच्या लोकांना स्थान द्या म्हणजे पक्ष वाढेल, असं म्हणतात. पण दुसरीकडे या पत्रामुळे वेगळीच सत्यस्थिती समोर येत असल्याने पक्ष एकाच जातीच्या नेतृत्वात चालवा काय अशी पक्षनेतृत्वाची इच्छा आहे की काय,’ असा प्रश्नही या निनावी पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.

 

वंदना चव्हान यांच्या कामामुळे एनजीओ बळकट झाल्या आहेत आणि पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. चेतन तुपे यांच्या पार्ट टाईम काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाच्या स्थापनेपासूनच ही सर्वात अयशस्वी कारकीर्द ठरणार आहे. नेत्यांना फसवून तुम्ही यशस्वी व्हाल पण पक्षाचे वाटोळे होणार आहे,’ असं म्हणत या पत्राद्वारे राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Leave a comment

0.0/5