महाजनांवर होणाऱ्या टीकेला धावून आले एकनाथ खडसे…..

एकनाथ खडसे | Eknath Khadse rushed to criticize Mahajan .....

गिरीश महाजन यांनी पुरग्रस्त भागात घेतलेल्या सेल्फीमुळे संपूर्ण राज्यातुन महाजन यांच्यावर टीका होत होती. त्यानंतर स्वतःहून महाजन यांनी पाण्यात उतरून पुरग्रस्थांना केलेल्या मदतीची मात्र कोणीही दाखल घेतलेली दिसून आली नव्हती. मात्र आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गिरीश महाजनांच्या सेल्फी प्रकरणात महाजनांच्या मदतीला धावून आले आहे. महाजनांवर या प्रकरणामुळे राज्यभरातून टीका झाली होती. खडसे यानी केलेल्या वक्तव्याबाबक आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ खडसे हे कायम महाजनांना टोले लगावत असतात. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी महाजनांचा केलेला बचाव विशेष समजला जातो.आपल्यावर झालेल्या आरोपांचा हवाला देत गिरीश महाजनांचा खडसेंनी बचाव केला. खडसे म्हणाले, कोल्हापूर, सांगली साताराच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहचली. एवढच काय तर स्वत:ही पाण्यात उतरून त्यांनी पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजनांनी केलेल्या मदतीपेक्षा मध्यमांनी त्यांच्या सेल्फीलाच प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here