Skip to content Skip to footer

विधानसभेचे अर्ज विकून इच्छुक उमेद्वारांकडून मिळविले काँग्रेसने १.७५ कोटी……

विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेद्वारांकडून अर्ज मागविले होते त्या अर्जांसॊबत खुल्या वर्गासाठी १५००० रु. देणे सुद्धा बंधनकारक होते. तर राखीव प्रवर्गाकडून १०००० रुपये देणे बंधनकारक होते. एकूण १४०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज काँग्रेस कार्यालयात जमा केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते भलतेच खुश झालेले दिसून येत आहे. अर्जासोबत घेण्यात आलेल्या शुक्लातून काँग्रेसला एकूण १.७५ लाखाचा फायदा झालेला दिऊन आला आहे.

या पूर्वी सुद्धा काँग्रेसने आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षाला मदत करण्याचे आव्हान केले होते परंतु या आव्हानाला कोणीही फारसा प्रतिसाद दिला नव्हता. एकूण ७०० इच्छुक उमेद्वारांनीं अर्ज दाखल केले आहेत. विशेष करून या ७०० पैकी २०० महिला ह्या आमदारकीसाठी इच्छुक आहे.

भंडारा जिल्ह्यातून १७ अर्ज दाखल झाले तर त्या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातून १६ अर्ज प्राप्त झाले होते. राष्ट्रवादी पक्षात सुद्धा आता पर्यंत ७५० इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहे.

Leave a comment

0.0/5