Skip to content Skip to footer

काँग्रेस मुक्त राज्य झाले आता राष्ट्रवादी मुक्त राज्य करूया – पंकजा मुंडे

राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर रासपचा महा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनगर आरक्षणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला हॅन्गलाच टोला मारला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्तर वर्षे कॉंग्रेस – राष्ट्रवादीने धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. आरक्षणाच्या दृष्टीने काहीही केले नाही. केवळ आश्वासन दिली. मात्र या सरकारने ते करून दाखवले.

पुढं बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली याआधी आम्ही कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र ती खरी केली आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा, असे म्हणत कार्यक्रमातील उपस्थितांना पुन्हा एकदा एकत्रितपणे सामान्य माणसांची सत्ता आणू असे आवाहन केले. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

विविध यात्रा काढून, सभा – मेळावे घेऊन मतदाराला आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अशी चुरस असतानाचं विरोधकांची एकी फुटली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामूळे निवडणुकी आधीचं विरोधकांच राजकारणातील अस्तित्वचं धोक्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5