राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणी तयार नाही – रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे | Nobody is ready to go to the Nation's haunt

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी गाठीभेटी, राजकीय दौरे या सारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’ असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवस्वराज्य यात्रेवर टीका केली आहे. तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर दानवेंनी भाष्य केले आहे.

तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर बोलताना दानवे यांनी भाजपची तुलना चक्क वॉशिंग मशीनसोबत केली आहे तर मोदी-शहांची तुलना चक्क निरमा पावडरशी केली, असे म्हणत दानवेंनी कार्यकर्त्यांसमोर वॉशिंग मशीन आणि निरमा पावडरचं भाजप कनेक्शन सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे बडे नेते दिलीप सोपल आज करणार शिवसेना पक्षात प्रवेश

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस मध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी विश्वसनीय दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here