Skip to content Skip to footer

इचलकरंजी मतदार संघात राष्ट्रवादीला शिवसेनेचा “दे धक्का”….

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शिवसेनेने जोरदार धक्का दिलेला आहे. एकीकडे भाजपा शिवसेना येणाऱ्या निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला गळती लागलेली आहे. आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्याचे काम खासदार अमोल कोल्हे करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतील बडे नेते पवारांची साथ सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे.

नायक चित्रपटातील ” तक्रार निवारणपेटी” तानाजी सावंत यांनी सत्यात उतरली…

आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि हातकलंगने मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत इचलकरंजी मतदार संघातील माजी नगर सेवक तथा माजी सभापती अविनाश बनगे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून सर्वांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात जाहीर स्वागत केले आहे. या पक्ष प्रवेशामुळे येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना पक्षाची ताकद पश्चिम महाराष्ट्रात वाढलेली दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5