धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

शिवसेनेत

शिवसेनेचे तब्बल ५० आमदार निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या तानाजी सावंत यांनी काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा प्रवेश पार पडला. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून तसेच हाती भगवा झेंडा देऊन चेडे यांचं शिवसेनेत स्वागत केलं आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. यावेळी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत हेसुद्धा उपस्थित होते. यामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांना पक्षाने धाराशिव आणि सोलापूर येथील जबाबदारी सोपवली आहे. यानंतर तानाजी सावंत यांनी दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना शिवसेनेत आणलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल, मोहोळचे भाजप नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोलापूर दक्षिणचे माजी काँग्रेस आमदार दिलीप माने इत्यादी दिग्गज नेत्यांनी आत्तापर्यंत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. तानाजी सावंत यांच्या आक्रमक रणनीतीमुळे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना चांगलीच फोफावत असल्याचं चित्र आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे. आगामी काळात तानाजी सावंत हा आकडा कितीपर्यंत वाढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिवसेनेच्या अयोध्यावारीचा प्रभाव:ठिकठिकाणी उभी राहिली राममंदिर प्रतिकृती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here