पन्हाळा गडावर चित्रित झालेल्या गाण्यावरून अमोल कोल्हे ट्रोल…..

अमोल कोल्हे | Amol Kol Troll from the song featured on Panhala Fort .....

भाजप सरकार महाराष्ट्रातील गडकिल्ले लग्नकार्य आणि हॉटेलसाठी भाड्याने देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आल्यानंतर टीकेची झोड उठवणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. ‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं पन्हाळा गडावर शूट झाल्याचे सांगत कोल्हेंनाच टीकेचं लक्ष्य केले जात आहे. “हुरहुर लागे श्वासांना” या गाण्याचं चित्रिकरण पन्हाळा गडावर झाल्याचं सांगत नेटिझन्सनी डॉ. अमोल कोल्हेंसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. गड किल्ल्यांविषयी पुळका आहे, मग चार वर्षांपूर्वी गड किल्ल्यांवर या रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण कसं केलंत? हा प्रश्न विचारला जात आहे.

कोल्हापुरातील पन्हाळा गडावर हे गाणं कधी शूट झालं? त्यावेळी अमोल कोल्हे कुठल्या पक्षात होते किंवा ते आता कुठल्या पक्षात आहेत, यापेक्षा त्यांनी पवित्र गड-किल्ल्यांवर अशी गाणं चित्रित करण योग्य आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे नेटकर्त्यांच्या रडारवर आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी गड किल्यावर उभारण्यात येणाऱ्या हॉटेल,रिसॉर्ट विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here