वसई-विरार येथील ठाकूरांच्या साम्राज्याला ठाकरे लावणार सुरुंग!

वसई-विरार येथील ठाकूरांच्या साम्राज्याला ठाकरे लावणार सुरुंग!

वसई-विरार येथील ठाकूरांच्या साम्राज्याला ठाकरे लावणार सुरुंग!

वसई-विरार परिसरात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. वसई-विरार महापालिकेवर बविआचे निर्विवाद वर्चस्व आहे. वसई विधानसभा मतदारसंघातून स्वतः हितेंद्र ठाकूर आमदार आहेत. तर त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे नालासोपारा येथून आमदार आहेत. बोईसर मतदारसंघात सुद्धा बविआ पक्षाचे विलास तरे आमदार होते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि वसई येथील नेते विजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेच्या वसई अध्यक्षांनी सुद्धा शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून नावाजलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो मंजूरही झालेला आहे. प्रदीप शर्मा हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. वसई-विरार परिसरातील बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बविआसमोर शिवसेनेचं आव्हान असणार आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले विजय पाटील वसई येथून हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार विलास तरे हे बोईसर येथून यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढवू शकतात. तर क्षितिज ठाकूर यांना नालासोपारा मतदारसंघात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा आवाहन देऊ शकतात. एकूणच बहुजन विकास आघाडी आणि ठाकुरांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पंडित हेसुद्धा शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार येथील ठाकूरांच्या साम्राज्याला आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंकडून सुरुंग लागणार आहे.

अमोल कोल्हे यांच्या पायगुणामुळेच राष्ट्रवादीची वाईट अवस्था-आढळरावांचा घणाघात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here