युती विरोधात बोलणाऱ्या मेहताला हाकला ! भाजप कार्यकर्त्याची मागणी……

भाजप | Mehta summoned against the Alliance! Demand of BJP activist ......

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा जेष्ठ नेते प्रमोद महाजन हे दोन महान नेते होते. या दोघांच्या स्मारकाला विरोध करत आमदार नरेंद्र मेहता यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोह्चवलेली आहे. याची दखल भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीत मिठाचा खडा टाकणाऱ्या आमदार नरेंद्र मेहताला हाकला अशी मागणी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेली आहे.

शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन होऊ नये यासाठी कुटीर कारस्थान करणाऱ्या नरेंद्र मेहता यांच्या कारवायामुळे भाजपाचे स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांच्या स्मारकाचे बासनात गुंडाळले गेले. मेहतांच्या या टक्केवारीच्या खाबुगिरी राजकारणाची भाजपाच्या निष्ठावंतांनीं धुलाई केली. भाजपाचे माजी जिल्हा सचिव राजेंद्र मोरे यांनी आमदार मेहतांच्या टक्केवारीचा पर्दाफाश केलेला आहे.

या आमदाराला जिथे टक्केवारी मिळते तिथे हा करोडोचा निधी देतो आणि महाराष्ट्राचे आणि देशाचे महान नेते असलेल्या बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या स्मारकासाठी मात्र यांच्याकडे पैसे नाहीत. या मेहतांनी “मीरा-भाईंदर भाजपा आणि पालिकेला स्वतःची सेव्हन-इलेव्हन लिमिटेड कंपनी करून ठेवली आहे. असे तडाखे मोरे यांनी लगावले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here