“करारा जवाब मिलेगा”ईडीच्या कारवाही नंतर कोल्हेंची मुख्यमंत्र्यांना धमकी..

ईडी |

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार तसेच इतर ७० जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. पवारांवर केलेली कारवाही सूडबुद्दीने केलेली कारवाही आहे असे आरोप पवार समर्थकांनी लावलेले आहे. तसेच पवारांच्या समर्थनास कार्यकर्त्यांनी “बारामती बंद” ची हाक सुद्धा दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते तर भाजपा नेत्यांवर तुटून पडले आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा नाबार्डचे अध्यक्ष अरोरा यांनी केला आहे. तसेच हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल केली गेली आहे. त्यानंतर २६ ऑगस्टला अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात शरद पवारांचा सुद्धा समावेश झाल्याचे समोर आलेले आहे. त्यांनतर संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चिडले असून भाजपा विरोधात निर्दशने करत आहे.

त्यापाठोपाठ आता शिवस्वराज्य यात्रेचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. “ED चा कुटील डाव समजायला माणसं काही येडी नाहीत ! मिलेगा …करारा जवाब मिलेगा…” असे ट्विट अमोल कोल्हे यांनी लिहिले आहे. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेंशन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here