Skip to content Skip to footer

बारामतीकरांनी मुंडे साहेबांना दिलेल्या त्रासाचा बदल डिपॉझिट जप्त करूनच घेतो-राम शिंदे

कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले पवारांचे नातू रोहित पवार यांचं डिपॉझिट जप्त करून बदला घेतो, असं भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे यांनी बोलून दाखविले आहे. गोपिनाथ मुंडे यांना बारामतीकरांनी आयुष्यभर त्रास दिला त्याचा बदला मी रोहित पवारांचे डिपॉझिट जप्त करून घेतो, असे राम शिंदे म्हणाले आहेत. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या सामना होणार आहे.

 

यासाठी दोनही नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राम शिंदे हे आपल्या कामाची पावती जनतेला देत आहेत. तर रोहित पवार हे आपण या मतदारसंघाचा कसा विकास करणार हे जनतेला पटवून सांगत आहेत.ही लढाई भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्वाची असल्याने संधी मिळेल त्या ठिकाणी दोनही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

 

रोहित पवारांना हरवण्यासाठी भाजपने चांगलीच ताकद पणाला लावलेली आहे. कारण भाजपचे खासदार सुजय विखे यांनी या मतदार संघात विशेष लक्ष घातलेले आहे.दरम्यान, कर्जत जामखेडमधून दोनही नेत्यांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या मंजुषा गुंड उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. परंतु त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्या भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5