बंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप AB फॉर्मचे वाटप…….

AB फॉर्म | BJP secretly distributes AB form for fear of revolt

शिवसेना आणि भाजपा युतीच्या घोषणेनंतर विरोधक यांच्या बरोबर दोन्ही पक्षातील इच्छुकांना सुद्धा धडकी भरलेली आहे. एकीकडे भाजपाने आपल्या विद्यमान आमदारांच्या कामगिरी वरून ३० आमदारांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. तर दुसरीकडे बंडखोरी रोखण्यासाठी गुपचूप AB फॉर्मचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे संभाव्य पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी भाजपा नेत्यांनी ही शक्कल लावलेली दिसून येत आहे.

बंडखोरी, नाराजीचा मोठा फटका बसण्याची भीती वाटत असल्याने भाजपाने अजूनही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. सध्या युतीसाठी खास करून भाजपसाठी निवडणुकीत वातावरण खूपच अनुकूल मानले जात आहे. तेव्हा निवडून येणं सहज शक्य होणार असल्याने अनेक जण अजूनही तिकीट मिळवण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत.

मात्र जागावाटपात अपेक्षित जागा सोडली न जाणे, तिकीट नाकारले जाणे, आयात उमेदवारांना संधी देणे असे प्रकार होत असल्याने पक्षात नाराजी आणि बंडखोरी उफाळून येण्याची भीती भाजपला आहे. म्हणूनच सर्वात शिस्तीचा पक्ष म्हणून घेणाऱ्या भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर न करता तिकीट वाटप सुरू केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here