आव्हाडांना पराभूत करण्यासाठी सेना तर्फे देणार ही रणरागिणी आव्हान…..

आव्हाडांना पराभूत करण्यासाठी सेना तर्फे देणार ही रणरागिणी आव्हान....._This war challenge will be given by the army to defeat Awhad.

आव्हाडांना पराभूत करण्यासाठी सेना तर्फे देणार ही रणरागिणी आव्हान…..
शिवसेनेने काल रात्री उशिरा अभिनेत्री दिपाली सय्यद यांना शिनसेनेत सामील करून घेतले आहे. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला सौ रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे तसेच सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते.त्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

दिपाली सय्यद यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. सय्यद यांच्या प्रवेशाने जितेंद्र आव्हाड यांन तगडे आव्हान मिळणार आहे. सय्यद यांना उमेदवारी देऊन शिवसेनेनी जातीय समीकरणे आणि सिनेक्षेत्रातली प्रसिद्धी या दोनही गोष्टींचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.

दिपाली सय्यद यांनी निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी २०१४ ला अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना आम आदमी पार्टीने उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांनी विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षामध्ये प्रवेश केला होता. आणि आता त्या शिवसेनेच्या तिकिटावर जितेंद्र आव्हाडांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here