Skip to content Skip to footer

एवढा कार्बन शोषणारी झाडं लवासामधून आणणार का? भाजपच्या रम्याचा पवारांना टोला………

एवढा कार्बन शोषणारी झाडं लवासामधून आणणार का? भाजपच्या रम्याचा पवारांना टोला………

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या रम्याने पुन्हा आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे वळवला आहे. यावेळी रम्याने आरे आणि लवासावरून त्यांच्यावर हल्लोबोल केला आहे. ‘आरे’ थोडं तथ्यही ऐका या मथळ्याखाली भाजपाने एक एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रम्या आणि एका व्यक्तीचे आरेतील वृक्षतोडीबाबत संभाषण दाखवण्यात आले आहे.

बागायती गावचे आहोत आपण. एक झाड जरी तोडलं तरी काळीज तुटतंच की पण इथे भावनेच्या पलिकडे पहायला हवे. काही संधीसाधू राजकीय हेतूने या प्रश्नाला भावनिक बनवत असल्याचं रम्या एका व्यक्तीला सांगतना दाखवण्यात आले आहे. आरेमध्ये २ हजार ७०० झाडं कापली जाणार आहेत. जी वर्षाला ८० ते ९० टक्के कार्बन शोषतात. मेट्रो ३ जेव्हा पूर्ण क्षमतेने चालू होईल तेव्हा ती वर्षाला २.२५ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी करेल. आता हे संधीसाधू इतका कार्बन शोधण्यासाठी २ कोटी पूर्ण वाढ झालेली झाडं काय लवासामधून आणून इथे लावणार का? असा सवाल करत रम्याने अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना टोला हाणला आहे.

Leave a comment

0.0/5