डॉ. डी. वाय.पाटील आणि आदित्य ठाकरे यांची भेट

पर्यावरण-पर्यटन-माध्यमां-Eco-tourism-media

डॉ. डी. वाय.पाटील आणि आदित्य ठाकरे यांची भेट राजकीय चर्चेला उधाण
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील व शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळाच्या विशेष कक्षात बुधवारी सायंकाळी भेट झाली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. या भेटीची कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

माझ्या सैनिकांमुळेच शिवसेना सत्तेत होती, आहे आणि राहणार – उद्धव ठाकरे


युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकदिवशीय कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांचे सकाळी अकरा वाजता उजळाईवाडी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते चंदगडला गेले. तेथील सभा आटोपून पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे सायंकाळी त्यांनी प्रचार सभा घेतली. त्यानंतर मुंबईला रवाना होण्यासाठी सायंकाळी पाच वाजता ते उजळाईवाडी विमानतळ येथे आले.

माझ्या सैनिकांमुळेच शिवसेना सत्तेत होती, आहे आणि राहणार – उद्धव ठाकरे

यावेळी आदित्य ठाकरे यांना डॉ. डी. वाय. पाटील भेटणार असल्याचा निरोप देण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनी विशेष कक्षात भेट झाली . डॉ. डी. वाय. पाटील यांचा आदित्य ठाकरे यांनी आशीर्वाद घेतले. दोघांत सुमारे अर्धातास बंद खोलीत चर्चा झाली. बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील अजून समजू शकला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here