पुण्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 

पुण्यातील-असंख्य-काँग्रेस-Pune-Numerous-Congress

पुण्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 
येन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना पुण्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा काँग्रेस पक्षात आउटगोइंग काही थांबायचे नाव घेत नाही आहे.

निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे तरीही पक्षांतर सुरूच आहे. मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराले आले असताना पुणे शहरातील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदारसंघातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचा पराभव होईल, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

भाजप प्रवेश करण्यापूर्वी हे कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती आहे. ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामध्ये माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप पुणे शहरात अधिकच मजबूत झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here