आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य मिळेल

आदित्य-ठाकरेंना-महाराष्ट-Aditya-Thakarena-Maharashtra

आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य मिळेल
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवांराचा जोरदार प्रचार सुरु झालेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हे देखील प्रचारासाठी सक्रीय झालेले दिसून आले आहेत. तसेच तेजस ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राने कधीही पाहिले नसेल, इतके मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास यावेळी तेजस ठाकरे यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहेत. सर्व उमेदवारांच्या सोबत आहेत. २४ तारखेला अख्खा महाराष्ट्र भगवा होणार, असे तेजस ठाकरे यांनी शिवसेना लोकसभा निवडणुकीसारखे भरघोस यश विधानसभा निवडणुकीत देखील मिळवणार असा विश्वास निर्माण केला आहे. दरम्यान, पुढे ते म्हणाले, सरडे-खेकड्यांच्या प्रजातींना माझं नाव देण्याचा उद्देश नाही, पण सह्याद्रीच्या रांगांकडे किती लक्ष वेधले जाते आणि संरक्षण मिळते, यात समाधान आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:-  सदा सरवणकरांनी ७००० कुटुंबांना मिळवून दिले हक्काचे घरं

सदा सरवणकरांनी ७००० कुटुंबांना मिळवून दिलं हक्काचं घर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here