जनतेला आकर्षित करण्यासाठी मनसेला मराठी कलाकारांचं इंजिन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी उपलब्ध असलेल्या वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केलं आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस,अमित शाह, राष्ट्रवादीचे शरद पवार इत्यादी प्रमुख नेत्यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विविध ठिकाणी सभा घेत प्रचाराला गती दिली आहे. राज्यात शिवसेना भाजपची लाट आहे. मनसेने अचानक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांना प्रचारासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. माहीम मतदारसंघातील मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी जनतेला आकर्षित करण्यासाठी मराठी कलाकारांना पाचारण केलं आहे.

सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली आहे. मागील ५ वर्षांत मनसेचा जनाधार कमालीचा घटला आहे. राज ठाकरेंशिवाय इतर नेत्याची क्रेझ उरली नाही. त्यामुळे मनसेवर मराठी कलाकारांचा आधार घेऊन जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याची वेळ आली आहे. रविवारी निघालेली रॅली वगळता मनसेच्या प्रचाराला फारसा प्रतिसाद नाही. या पार्श्वभूमीवर कलाकार आता मनसेला तारणार का हे आगामी काळच सांगे.

संदीप देशपांडे यांच्या जाहीरनाम्यात मुंबईबाहेरील फोटो

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here