Skip to content Skip to footer

खैरेंना जनतेने नाकारले आता शिरसाट यांची बारी?

विधानसभेच्या निवडणूका आता तोंडावर आलेल्या आहेत व प्रतिस्पर्धी सोबतच नागरिकांमधील चुरस वाढत चालली आहे. औरंगाबाद विभागाच्या पश्चिम मतदारसंघातील संजय शिरसाट व राजू शिंदे यांच्यातील लढत पाहण्यासारखी असेल. संजय शिरसाट मागील १० वर्षांपासून विद्यमान आमदार आहेत व राजू शिंदे हे उच्चभ्रू भागाचे नगरसेवक आहेत, ‘शिलाई मशीन’ हे शिंदेंचे निवडणूक चिन्ह आहे.

या भागातील नागरिकांच्या मते येथे आपल्याला सत्ता बदल पाहायला मिळू शकतो, राजू शिंदे यांची या भागात लोकप्रियता वाढत चाललेली आहे. मागच्या ५ वर्षात राजू शिंदे यांनी केलेली कामे लक्षणीय असून या भागातील नागरिक त्यांच्या कामावर प्रचंड खुश आहेत. आताची जनता सुज्ञ आहे व फक्त पक्षाला न पाहता त्यांच्या लोकप्रतिनिधीला पाहून आता सर्व मतदान करतात, संजय शिरसाट मात्र आपल्या मतदारसंघातील नागरिकांना खुश ठेवण्यात कमी पडले आहेत हे नक्की.

पश्चिम भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे व राजू शिंदे यांच्या कार्याने ते प्रभावित असून त्यांच्याच पाठीशी ते उभे राहतील असा अंदाज आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आधीच मोठे खिंडार औरंगाबादेत पडले आहे त्यात विधानसभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होईल असेच दिसते. लोकसभा निवडणुकीत खैरे साहेबांना औरंगाबादकरांनी घरचा रस्ता दाखवला व आता विधानसभेच्या निवडणुकीत जुनं ते सोनं म्ह्णून संजय शिरसाट यांना ते मत देतील का विकासासाठी बदल म्हणून राजू शिंदे यांना मत देतील?

Leave a comment

0.0/5