देवरा आणि निरुपम काँग्रेसचे खरे नेते नाहीत – शरद पवार

देवरा-आणि-निरुपम-काँग्रे-Deora-and-Nirupam-Congress

देवरा आणि निरुपम काँग्रेसचे खरे नेते नाहीत – शरद पवार
ग्रामीण भागात अजून सुद्धा काँग्रेस नेत्याची नाळ जोडलेली आहे. मात्र संजय निरुपम आणि मिलिंद देवरा हे तळागाळातील नेते नाही तसेच ते काँग्रेसचे खरे नेते नाहीत असा आरोप असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  व्यक्त केले आहे. एका दैनिक इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते. त्यामुळे आता काँग्रेसचे खरे नेते कोण आणि खोटे कोण हा ठरवण्याचा अधिकार सुद्धा पवारांनी दिलेला आहे असेच जाणवते.

हिंदुस्थान टाइमला दिलेल्या मुलाखतीत पत्रकाराने पवारांना विचारले की, काँग्रेस मध्ये अजून सुद्धा गटातटाचे राजकारण आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यासारखे नेते एकमेकांवर टीका करत आहे. तेव्हा पवार म्हणले की, अजून सुद्धा ग्रामीण भागात काँग्रेसची नाळ जनतेशी जोडलेली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार न पाहता फक्त काँग्रेस पक्षाला पाहून मतदान करत आहे. तुम्ही जी नवे घेतली ते काँग्रेसचे खरे नेते नाहीत असे मत पवारांनी व्यक्त केले.

हे ही वाचा-:

राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडलंय, त्यांना मतदान करून ‘घाटे का सौदा’ करु नका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here