मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिपदाचे आश्वासन ; मतदारांचा कल डॉ. राहुल आहेर यांच्या कडे…

Rahul Aher will become minister

चांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन करत ‘तुम्ही आमदार द्या, मी तुम्हाला नामदार देतो’ हे आश्वासन दिल्याचे गारुड मतदारांच्या मनाशी चांगलेच बिंबले आहे. यामुळे मतदारसंघात महायुतीचे उमदेवार डॉ. राहुल आहेर यांचे पारडे जनता मतांनी भरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे एक्झिट पोलद्वारे अंदाज वर्तवले जात आहेत. त्या पार्श्ववभूमीवर चांदवड येथील महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. राहुल आहेर यांना निवडून देण्याचे आवाहन करून तुम्ही डॉ. आहेरांना चांगले मताधिक्य दिल्यास मी त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नक्कीच स्थान देईल असे जाहीर कले. यामुळे या आश्वासनांची चांगलीच चर्चा होत असून मतदारसंघाला मंत्रिपद मिळाल्यास मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो ही भावना मतदारांमध्ये रुजल्याने मतदारांचा कल डॉ. राहुल आहेरांकडे वाढल्याचे सध्याचे चित्र आहे.

चांदवड-देवळा मतदारसंघाला आतापर्यंत कधीही मंत्रिपद मिळाले नसल्याने या मतदारसंघाचे बहुतांशी प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सत्ताधारी पक्षाकडे स्वतःचे राजकीय वजन वापरून मतदारसंघात विकासाचे नवे मॉडेल उभे केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी चांदवड-देवळा मतदारसंघाला त्यांनी आणला. त्यामुळे डॉ. राहुल आहेरांना संधी मिळाल्यास ते या मतदारसंघाचे चित्र नक्कीच बदलू शकतात. हा समज मतदारांमध्ये वाढत असल्याने मतदारांचा कल आहेरांच्या बाजूने दिवसागणिक वाढत जात आहे. विरोधी पक्षाचा आमदार निवडून दिल्यास विकासकामांसाठी निधी मिळत नाही. त्यामुळे मतदार प्रांतवाद, भाषावाद यामध्ये न पडता, त्यांना विकास हवा असल्याने मतदार महायुतीच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्धार बोलून दाखवत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here