अजित पावर हे राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे स्टार प्रचारक

SHIVSENA

अजित पावर हे राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे स्टार प्रचारक -संजय राऊत
विधानसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षाच्या एकमेकांवर आरोपाच्या फेऱ्या वाढलेल्या दिसून येत आहे. प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राउत हे प्रचारानिमित्त लासलगाव येथे आले असता त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना संजय राउत म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेनेचा प्रचार करत आहेत राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रचारासाठी लासलगावात येऊन गेले, पण अजित पवार येथे येणार नाहीत. कारण, संभाजी पवार येवला-लासलगावातून निवडून यावे अशी अजित पवारांची इच्छा आहे असे विधान केले.

पुढे बोलताना राऊत यांनी अजित पवारांनी बाळासाहेबांच्या अटकेबाबत भांडाफोड केला छगन भुजबळांची पोलखोल केली, त्यामुळे अजित पवार हे राष्ट्रवादीचे नाही तर शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत’ असं विधान करत छगन भुजबळ आणि अजित पवारांच्यामधील वादाचा उल्लेख संजय राऊत यांनी केला होता.

हे ही वाचा-:

कल्याण मधील तिन्ही महायुतीच्या उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here