बसपा कार्यकर्त्यांनी काढली आपल्याच उमेदवाराची धिंड

बसपा-कार्यकर्त्यांनी-काढ-BSP-activists-remove

बसपा कार्यकर्त्यांनी काढली आपल्याच उमेदवाराची धिंड
सोमवारी राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर उद्या निवडणुकीचे निकालही लागणार आहे. अशातच बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बसपाच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची धिंड काढल्याचा प्रकार घडला. पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उमेदवाराला मारहाण केली, तसंच त्यांची गावातून धिंड काढली. अशोक माने असं त्या उमेदवाराचं नाव आहे.

बसपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदत केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली नसल्याचेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. माने यांना बसपाकडून उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना राग अनावर झाला.

माने यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, त्यांची उमेदवारी कायम राहिली होती. दरम्यान, राग अनावर झाल्यानं कार्यकर्त्यांनी माने यांना मारहाण केली. तसेच त्यांचे कपडे फाडले आणि तोंड काळे करून त्यांची धिंड काढली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here