आमदार विनय कोरे यांचा भाजपाला पाठिंबा

आमदार-विनय-कोरे-यांचा-भाज-MLA-Vinay-Korey-Bhaj

आमदार विनय कोरे यांचा भाजपाला पाठिंबा

एकेकाळी काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारमध्ये अपारंपरिक ऊर्जा मंत्री पद भूषविलेले आणि सध्या महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे( सावकार) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन भाजपाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

महाराष्ट्र भाजपने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. विनय कोरेंच्या पाठिंब्यामुळे भाजपची ताकद अजून वाढली असून आतापर्यंत एकूण नऊ अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ १०५ वरून ११४ जागांवर पोहचलं आहे.
दरम्यान एकीकडे शिवसेनेने सत्तास्थापनेत ५० टक्के वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरही दावा केला आहे. तसंच

लोकसभेपूर्वी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. यावरूनच आता भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here