राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर रितेश देशमुख यांनी मांडले मराठी माणसाचे मत

रितेश देशमुख | Ritesh Deshmukh proposes Marathi man's opinion after the imposition of President's rule

निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेने घेतलेली वेगळी भूमिका आणि कोणताही राजकीय पक्ष १४५ हा जादुई आकडा गाठण्यात सफल न ठरल्याने राज्यात अखेर मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यावर सर्व स्थरातून राष्ट्रपती राजवटी विरोधात मत मांडले जात आहे. राष्ट्रपती राजवटीवर अनेकांनी आपलं मत मांडलं असताना अभिनेता रितेश देशमुख याने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश देशमुख म्हणाला, ”राज्यातील राजकीय वातावरण काय आहे हे मला माहित आहे. भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आणि राष्ट्रवादी व काँग्रेस हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार होते. महायुतीला बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्दयांवर भाजपासोबत जाण्याचे टाळले.

कोणताही राजकीय पक्ष संख्याबळाचा निकष पूर्ण करु शकत नसल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी जरी राजकीय असली तरी या देशाचा एक नागरिक म्हणून मला पाच वर्षांचे स्थिर सरकार हवे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here