“हारना और डरना मना है” संजय राऊतांचे सूचक ट्विट

संजय राऊत | Sanjay Rauta's suggestive tweet

गेल्या काही दिवसापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठका चालू झालेल्या आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यातच सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. राज्यात एकीकडे युतीत असणारे भाजप-शिवसेना मित्रपक्षांचे गणित बिघडले आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत संकेत मिळत आहे. दरम्यान नुकतंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे.

हार हो जाती है, जब मान लिया जाता है. जीत तब होती है, जब ठान लिया जाता है असे या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर या ट्विटला कॅप्शन देताना अब हारना और डरना मना है..असेही त्यांनी म्हटलं आहे. एखादा तेव्हाच हरतो जेव्हा त्यांनी मी हरलो असे मान्य केलेले असते आणि तेव्हाच जिंकतो जेव्हा तो आपल्या मनाशी निर्धार करतो असे त्यांना ट्विटमधून सुचवायचे आहेत. आता हरणार नाही आणि घाबरणारही नाही असे त्यांनी म्हटलं आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here