महाशिव आघाडीचा मसुदा ठरला शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास दोन्ही पक्ष अनुकूल

महाशिव आघाडी | Both sides agree to give Shiv Sena the post of Chief Minister

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग धरला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा निश्चित झाला आहे. महाशिवआघाडीतील नेत्यांची बैठक नुकतीच संपली. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर तो जनतेपुढे मांडला जाईल. या ४० मुद्द्यांच्या अजेंड्यांत शेती, रोजगारनिर्मिती, दुष्काळ निवारण व उद्योगवाढीवर भर आहे. या बैठकीत ज्या मुद्य्यांवर चर्चा झाली त्या संबधीचा सविस्तर तपशील हाय कमांडला सदर केला जाईल. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली आहे.

राज्यात राजवट लागू असूनही सत्ता स्थापनेसाठी बैठकांचा जोर वाढला आहे. बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची दहा तास बैठक चालली. या बैठकीस काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे व विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ व नसीम खान, तर शिवसेनेकडून सुभाष देसाई व एकनाथ शिंदे हजर होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here